1) "मला माझ्या मनासारखं जगायला हवं होतं, दुसऱ्यांच्या अपेक्षेनुसार नाही."
(I wish I'd had the courage to live a life true to myself, not the life others expected of me.)
हा सगळ्यात मोठा आणि कॉमन पश्चात्ताप आहे.
लोक म्हणतात – “मी आयुष्यभर दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगलो. माझ्या मनातलं ऐकलंच नाही.”
का होतं असं?
समाजाची भीती
कुटुंबाच्या अपेक्षा
- सुरक्षिततेसाठी केलेले compromises
लोक काय म्हणतील ही चिंता
आजच्या तरुणांसाठी धडाः
तुझं करिअर, तुझं जीवन - ते तुझ्या मनाच्या आवाजावर उभं राहायला हवं, केवळ इतरांच्या अपेक्षांवर नाही.
2) ← मला एवढं कष्ट करून, फक्त कामातच अडकून राहायचं नव्हतं."
(I wish I hadn't worked so hard.)
ब्रॉनी वेअर म्हणते की, विशेषतः पुरुष रुग्णांनी हा पश्चात्ताप खूपदा व्यक्त केला. लोक शेवटी म्हणतात – “मी पैसा कमावण्यात आयुष्य घालवलं, पण माझं कुटुंब, माझी मुलं, माझे क्षण... सगळं हातातून निसटलं."
का होतं असं?
करिअरची धावपळ
“जास्त पैसा = जास्त आनंद" ही चुकीची समजूत
- नात्यांना वेळ न देणे
आजच्या तरुणांसाठी घडाः
Work-life balance ही फक्त एक संकल्पना नाही, तर आयुष्य जगण्याची खरी कला आहे. पैसे नेहमी पुन्हा कमावता येतात, पण वेळ आणि नाती पुन्हा परत मिळत नाहीत.
३.) "मला माझ्या भावना व्यक्त करायला हव्या होत्या."
(I wish I'd had the courage to express my feelings.)
शेवटी लोकांना कळतं - ते प्रेम, राग, कृतज्ञता, आपुलकी... सगळं मनात दाबून ठेवतात.
- एखाद्या व्यक्तीवर प्रेम होतं पण कधी सांगितलं नाही.
कोणावर राग आला पण गप्प बसलो.
- कोणाबद्दल कृतज्ञता होती पण व्यक्त केली नाही.
उदाहरणः
एका मुलीला तिच्या आईला सांगायचं होतं – “तू माझ्यासाठी जगातली सर्वात मोठी ताकद आहेस.” पण तिला वाटलं, “आईला माहितीच असेल, सांगायची गरज नाही.” आई गेल्यावर मात्र पश्चात्ताप झाला की- "का नाही मी बोलले?"
आजच्या तरुणांसाठी धडाः
Feelings दाबून ठेवली की ती नातं खाऊन टाकते. बोलून दाखवलं की नातं जिवंत राहतं.
4) "मला माझ्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा होता."
(I wish I had stayed in touch with my friends.)
लोकांना शेवटी जाणवतं की खरी किंमत पैशाची, पदाची नसते. खरी किंमत म्हणजे माणसांची सोबत.
- करिअरमध्ये व्यस्त राहून आपण शाळेतले मित्र, कॉलेजमधले दोस्त विसरतो. - WhatsApp वर "कधीतरी भेटू" म्हणतो... पण ती भेट कधीच होत नाही.
उदाहरणः
एका माणसाने 25 वर्ष बिझनेसमध्ये घालवली. जुने मित्र फोन करत, पण तो म्हणायचा, "कामात आहे, नंतर बोलू." शेवटी जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता, त्याच्या खोलीत फक्त दोन-तीन जवळचे लोक होते... बाकी सारे हरवलेले चेहरे आठवणींमध्येच राहिले.
आजच्या तरुणांसाठी धडाः
खरा गुंतवणूक म्हणजे "Relationships". मित्रांशी बोलायला, वेळ द्यायला कधीच उशीर करू नका.
5) "मला स्वतःला आनंदी राहायला हवं होतं."
(I wish that I had let myself be happier.)
सर्वात मोठा आणि खोल पश्चात्ताप हा आहे.
लोकांना जाणवतं की आनंद हा एक निवड आहे, परिस्थिती नाही.
पण त्यांनी आयुष्यभर आनंद पुढे ढकललाः
- "जेव्हा घर होईल तेव्हा आनंदी होईन."
- “जेव्हा promotion मिळेल तेव्हा खुश होईन."
- "जेव्हा सगळं perfect होईल तेव्हा मी आनंदात राहीन.”
उदाहरणः
एका माणसाने संपूर्ण आयुष्य "perfect moment" च्या प्रतीक्षेत घालवलं. पण तो क्षण आला नाही. शेवटी त्याला उमगलं - "आनंद म्हणजे परिस्थिती नाही, तो आतून घेतलेला निर्णय आहे.”
आजच्या तरुणांसाठी धडाः
आनंदाला postpone करू नकोस. "जे आहे त्यात आनंदी राहा, आणि पुढे वाटचाल करत राहा."
* एकंदरित शिकवणः
हे पुस्तक आपल्याला एकच गोष्ट सांगतं - शेवटच्या क्षणी आपण आयुष्य मागे वळून बघताना पश्चात्ताप नको, समाधान हवं.
तेव्हा -
१ स्वतः हवं तसं जग,
२. नाती जप,
३. भावना व्यक्त कर,
४. मित्रांशी जोडलेला राहा,
आणि आनंद आताच निवड.
ब्रॉनी वेअर (Bronnie Ware) या ऑस्ट्रेलियन नर्सने “The Top Five Regrets of the Dying" हे पुस्तक लिहिलं आहे. ती 'palliative care” मध्ये काम करायची - म्हणजे जे लोक शेवटच्या दिवसांत असतात, त्यांची सेवा करायची. त्या लोकांनी तिला आयुष्यभराच्या अनुभवातून सांगितलेल्या पश्चात्तापांवर हे पुस्तक आधारित आहे