सुविचार

सुविचार
  •   सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. 
  •  आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते.
  •  प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी केलेला संवाद होय. 
  •  जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.. 
  •  यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. 
  •  प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. 
  • ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. 
  •  यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. 
  • प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस 
  • चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
  • मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
  • छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. 
  • आपण जे पेरतो तेच उगवतं.
  • फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. 
  • उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. 
  • शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
  • प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. 
  • आधी विचार करा; मग कृती करा.
  • आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका, 
  • फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! 
  • एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. 
  • अतिथी देवो भव ॥ 
  • अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा. 
  • दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
  • आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका 
  •  निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
  •  खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. 
  •  उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. 
  •  चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्त्याने आणि सन्मानाने करा. 
  •  नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. 
  •  माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
  •  सत्याने मिळतं तेच टिकतं.
  •  जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो. 
  • परमेश्वराच्या आशीर्वादा शिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही. 
  • हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
  • स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो. 
  •  प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
  •  खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची 
  •  तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. 
  • वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
  • जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही. 
  • गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. 
  •  झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो. 
  • माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी 
  • क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही. 
  • सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा 
  • मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा. 
  • आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे. 
  • बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. 
  • मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते 
  • तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. 
  • शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
  • मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. 
  • आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. 
  • एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा. 
  • परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी 
  • खिडकी म्हणजे आकाश नसतं. 
  • जगण्यात मजा आहेच पण त्याहून अधिक मजा फ़ुलण्यात आहे 
  • वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. 
  • भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते. 
  • कविता म्हणजे भावनांचं चित्र! 
  • संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. 
  • तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. 
  • ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव ! 
  • स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका. 
  • अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. 
  • तुलना करावी पण अवहेलना करू नये.
  • समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. 
  • आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. 
  •  मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. 
  • चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. 
  • व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा. 
  • आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. 
  • तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. 
  • अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे. 
  • विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
  • मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका. 
  • आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका. 
  • आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. 
  • प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही. 
  • तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. 
  • सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
  • काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं. 
  • लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं. 
  • चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
  •  तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. 
  • भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
  • चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
  • आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. 
  • उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही
  • पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
  • अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात. 
  • मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. 
  • रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन ! 
  • अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे. 
  • अंथरूण बघून पाय पसरा. 
  • कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात. 
  • तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा. 
  • अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
  • संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच. 
  • सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात. 
  • सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 
  • शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥ 
  • सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
  • विद्या विनयेन शोभते ॥ 
  • शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे. 
  • जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा. 
  • एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही. 
  • कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
  • आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते. 
  • ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही. 
  • कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
  • देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ! 
  • आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. 
  • मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
  •  ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो. 
  • जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा. 
  • आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. 
  • रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो. 
  • जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
  • लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
  • कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. 
  • जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
  • पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
  • आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात